खामगाव शिवसेनेचे दणक्याने कुंभेफळ बस फेरी 10 ते 15 वर्षानंतर झाली सुरू……

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
जि.डी. रोकडे खामगाव
खामगाव :-
बरेच वर्षापासून येथील कुंभेफळ बस फेरी बंद होती . परंतु शिवसेनेचे दणक्याने कुंभेफळ बस फेरी सुरू करण्यात आली . सविस्तर वृत्त असे की वारंवार निवेदन देऊनही अद्याप पर्यंत बस फेरी चालू करण्यात आली नव्हती परंतु शिवसेना शिंदे गट तथा नियोजन समिती सदस्य तालुकाप्रमुख राजुभाऊ बघे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यां विद्यार्थिनी यांची गैरस्वय होत आहे अशा बाबतचे निवेदन देतास संबंधित अधिकारी यांनी उद्यापासून कुंबेफळ बस फेरी चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले. राजूभाऊ बघे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याविरुद्ध जाब विचारलं असता विद्यार्थ्यांना होत असलेल्या प्रकाराबद्दल आपण गंभीर का नाही व आपण विद्यार्थ्यांना एकदम उद्रेक वागणूक देतात असे चांगलेच धारेवर धरले. असा प्रकार पुन्हा घडल्यास विद्यार्थी विद्यार्थिनीसह आम्ही सुद्धा ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. कारण वाहकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांनी ला तीन तीन चार चार तास बस स्थानकावर बसून राहावे लागते . वरील प्रकार पुन्हा घडू नये असे अशी समज खामगाव आगार अधिकाऱ्यांना दिली. यावेळेस भालेगाव येथील विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..



