Uncategorized

रिसोडचा मतदा कोणाला घालतो वाराअनेकांना विधानसभेचे डोहाळे

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव -ः वाशिम जिल्ह्यातील रिसोड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय.रिसोड विधानसभा मतदारसंघाचे राजकारण वेगळेच दिसते लोकसभेला तो भाजपकडे झुकतो आणि विधानसभेला कॉग्रेस जवळ करतो . रिसोड- ३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, रिसोड मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मालेगांव आणि रिसोड ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो..
वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीय संवेदनशील मतदारसंघ म्हणून रिसोड विधानसभा मतदारसंघ , पूर्वी या मतदारसंघांची मेडशी अशी ओळख होती. मात्र 2009 पासून या मतदारसंघाला  ‘रिसोड’ ही नवी ओळख मिळाली. या मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा आणि झनक घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. रामराव झनक,सुभाष झनक यांच्यानंतर आता अमित झनक हे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
आमदार अमित झनक येथून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, या दोन तालुक्यातील नगर पालिका आणि पंचायत समित्यांवर भाजप – शिवसेनेचा म्हणजे महायुतीचा वरचष्मा आहे. या मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सर्वात गंभीर झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. बेकार व बेरोजगार तरुणांना रोजगार हमी नाही. तर महाविकास आघाडी मध्ये या मतदार संघावर कॉग्रेस चा प्रबळ दावा आहे. तर काही कॉंग्रेशी इच्छुक हायकमांडच्या मर्जीतून आपल्या ताटात तिकीट पडले यावर विसंबून आहेत.
रिसोड विधानसभा मतदारसंघ – ३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, रिसोड मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मालेगांव आणि रिसोड ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो. रिसोड विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्यातील ही सर्वसाधारण वर्गाची विधानसभा जागा आहे. हे वाशिम जिल्ह्यात वसलेले आहे आणि अकोला संसदेच्या 6 विधानसभा क्षेत्रांपैकी एक आहे .
आगामी विधानसभा  निवडणुकीत भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेल्या अनंतराव देशमुख आणि पुत्र नकुल देशमुख भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत . कॉंग्रेसच्या  गडाला सुरुंग लावणारे,    एकदा विजय मिळवणारे  संघाचे कट्टर असलेले  माजी आमदार  विजयराव  जाधव  यांनी आपली ताकत  उमेदवारी मिळवण्यासाठी लावत आहेत. 
लखन ठाकूर, सुनील पाटील, राजू पाटील राजे यांच्यासह महायुतीतील  शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विधान परिषद सदस्या भावना गवळी ( वाशीम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे त्यांची झांशी तर परत मिळवायची आहे च आणि रिसोड म्हणजे ‘ इंदौर ही कब्जात ठेवावयाचे आहे. ) यांनी ही या मतदार संघावर आपला दावा सांगितला आहे. त्या आपल्या एखाद्या विश्वासू कार्यकर्यास ही जहागीरी देतील अशी चर्चा आहे. पण त्यांनी बाहेरचा उपरा उमेदवार देऊ नये म्हणजे झाले. त्यात काही जणांचे नाव चर्चेत येतीलच. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून दिलीप जाधव यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. ते पुन्हा हात दाखवून अवलक्षण करून घेतात काय यावर त्यांच्यातच उलट सुलट चर्चा केली जात आहे.
महायुती मध्ये ही जागा कोणाला सुटते यावरच बरेच काही अवलंबून असणार आहे. महायुतीत तिन पायाची शर्यत दिसून येते. भावना गवळी यांना इंदोर संस्थान उभारावयाचे आहे, विजय जाधव यांना गडकऱ्यांच्या मदतीने हा गड परत सर करायचा तर दिलीप जाधव सहकारी अजीत दादा गटाला येथे बस्तान बसविण्याची मोहीम हाती घ्यायची आहे.
चौकट १
स्वाभिमानी आणि वंचितही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार  
या मतदारसंघात शेतकरी आणि तरुणाचे  प्रश्न घेऊन  स्वभिमानी शेतकरी संघटनेने मोठी तयारी केली असून कार्यकर्त्याची फळी आणि गावागावात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले हे रिंगणात उतरणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीही आपला उमेदवार उतरवणार असून किरण गिर्हे  हे  उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.  प्रशांत गोळे आणि  रविंद्र मोरे  हेदेखील वंचित बहुजन आघाडीकडून दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिसोड मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरली तर चौरंगी लढत होणार हे निचित आहे. 
चौकट,२
मतदारांची वर्गवारी
रिसोड विधानसभेत अनुसूचित जातीचे मतदार अंदाजे 63,331 आहेत जे 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 20.94% आहे.
रिसोड विधानसभेत ST मतदारांची संख्या अंदाजे 26,706 आहे जी 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 8.83% आहे.
रिसोड विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या अंदाजे 28,430 आहे जी मतदार यादीच्या विश्लेषणानुसार सुमारे 9.4% आहे.
रिसोड विधानसभेतील ग्रामीण मतदारांची संख्या अंदाजे 276,402 आहे जी 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 91.39% आहे.
रिसोड विधानसभेत शहरी मतदारांची संख्या अंदाजे 26,040 आहे जी 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 8.61% आहे.

चौकट ३
2019 सालची विधानसभा निवडणूक निकाल
अमित सुभाष झनक, काँग्रेस- 69,875 (2,141 मतांनी विजयी) 
अनंतराव विठ्ठलराव देशमुख, अपक्ष – 67,734
दिलीप जाधव, वंचित बहुजन  आघाडी – 34,475.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button