रस्त्याची व पूल दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मंगरूळपीर : – येथून जवळच असलेल्या ग्रा. येडशी ते अकोला जाणारा मुख्य रस्ता आणि पुलाचे काल झालेल्या अति मुसळधार पावसामुळे नुकसान होऊन दुरावस्था झाली आहे पुलावरून पाणी गेल्यामुळे रोड खरडून निघाला आहे,पाणी वाहते आहे यामुळे रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना त्रास होतोय पुलावरून पाणी वाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनाने & प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या आणि समस्त गावकरी मंडळ येडशीच्या वतीने करण्यात आली आहे.याठिकाणी उपस्थित शेतकरी महादेवराव बारड, रामेश्वर सुर्वे , गणेश बारड(पोलीस पाटील ), मंगेश बारड, सदानंद धोंगडे, नामदेव भाऊराव बारड, इत्यादी उपस्थित होते.ही सदर माहीती आशिष म. बारड यांनी दिली.



