Uncategorized

मेडशी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही बैल – पोळा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : -मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील बैल – पोळा हा सण खूप आनंदात साजरे करण्यात आला . तसेच वेगवेगळ्या प्रकारची रंगरंगोटी व बैलांवर साज करून, मंगला अष्टगाते चे वाचन करून, आठवडी बाजारात तोरण बांधून, सजलेल्या बैलांचे पूजन व तसेच श्रीफळ पोडून, फटाक्यांच्या आवाजात पोळा हा कार्यक्रम संपन्न करण्यात आले , यामध्ये मेडशी परिसरातील सर्व धर्मीय शेतकरी, पशुपालक बांधव, तसेच मेडशी ग्रामपंचायत मेडशीच्या वतीने व्यवस्था करण्यात आली व सरपंच शेख जमीरभाई यांच्यावतीने उत्कृष्ट सजावट केलेल्या मालकांना बक्षीस वितरण केले यावेळी उपसरपंच शेख रजाकभाई,माजी उपसरपंच धीरज मंत्री, शिवसेना तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वरभाऊ मुंडे,ग्रामपंचायत सदस्य जगदीश नाईक मुलचंद चव्हाण,जुम्मा गौरे , रमजान गौरे ,नानाभाऊ तायडे,सुभाष तायडे,संजय भागवत,धन्नु भवानीवाले सेवा सहकारी सोसायटी सचिव जगदीश बहादुरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व महाराज श्री .कैलाश तोडकर यांच्या शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला समस्त नागरिकांच्या उपस्थित बैलपोळा हा सण आनंदात साजरा करण्यात आले यामध्ये पोलीस प्रशासन, तंटामुक्त समिती, व समस्थ गावकऱ्यांच्या उपस्थित अतीशय उत्साहात मेडशी आठवडी बाजार परिसरामध्ये पोळा हे सण सर्वधर्मीय बांधवांना च्या माद्यमातून उत्सव आनंदात एकजुटीने साजरे करण्यात आले.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले यांच्या कडून मिळाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button