गणेशपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,(आंबेडकरी समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.)

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशीम:- तालुक्यातील गणेशपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चबुतरावर एका समाज कंटकांनी दि.३ सप्टेंबर रोजी लघुशंका करून विटंबना केली आहे.
हे समाजकंटक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी बौद्ध समाजातील महिला व पुरुषांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे.त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
म्हणून आंबेडकरी समाजाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना दि.४सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर जेष्ठ कवी अनिल कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ अंभोरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव डॉ संजय पडघान, सम्राट टाइम्स चे संपादक विनोद तायडे, दिशा समितीचे सदस्य प्रवीण पट्टेबहादूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव विशाल पडघान, महीला आघाडीच्या सुनिता कांबळे, युवा नेतृत्व भूषण मोरे,शेतकरी संघटनेचे नेते अरुण शेळके पाटील, समाजसेवक रविंद्र जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पुढे निवेदनात नमुद केले की, गणेशपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चबुतरावर लघुशंका करणारे व त्यांना साथ देणार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करावे.हे समाजकंटक गुंड प्रवृत्तीचे असून यांचेवर कठोर कारवाई करावी.आणि या घटनेचा आम्ही वाशीमकर जाहीरपणे निषेध करतो.
आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे.अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे.



