मेडशी येथे लखपती दीदी संवाद व सन्मान सोहळा संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महिला प्रभाग संघ मेडशी यांच्या वतीने स्थानिक केंद्रीय प्राथमिक शाळा मधील उमेद महिला प्रभाग संघाच्या हॉलमध्ये लखपती दीदीचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
लखपती दीदी मोहीम ही केवळ माता-भगिनींच्या उत्पन्नाला चालना देण्याचा मार्ग नसून कुटुंब आणि भावी पिढ्यांना बळकट करण्यासाठी एक मोठी मोहीम आहे,हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की,यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट होत आहे.लखपती दीदी एक स्वयं-मदत गट सदस्य आहे ज्याचे वार्षिक घरगुती उत्पन्न ₹1,00,000 पेक्षा जास्त आहे.आर्थिक यशापलीकडे,ते शाश्वत उपजीविकेच्या पद्धतींचा अवलंब करून आणि एक सभ्य जीवनमान प्राप्त करून प्रेरणा देतात.उमेद हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून उमेद अभियानअंतर्गत अनेक उपाययोजना तथा अनेक उपक्रम राबवून प्रयत्न करीत आहे.येथील महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक होतकरू महिलांना उमेदच्या सहकार्याने आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून छोटे छोटे गृह उद्योग उभे करत कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवत मदत करत प्रगती केली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प सदस्या सौ लक्ष्मीताई तायडे,उपसरपंच सौ संध्याताई मेडशीकर,शांताबाई तायडे,मिराबाई मुंडे,दिपाली तायडे,महिला प्रभाग संघाच्या मनीषा घुगे,लता धाबे,मीरा करवते,छाया थोरात,मीना सहस्त्रबुद्धे, लक्ष्मी पवार,रूपाली वानखडे,आशा वानखडे,लता जाधव,आलीमा गौरे,प्रमिला राठोड,रेणुका राठोड,नर्गिस बेनिवाले,वनिता खिल्लारे सह मेडशी परिसरातील शेकडो बचत गटातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन तज्ञ प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रियाताई पाठक यांनी केले.सदर कार्यक्रमाची रूपरेषा प्रभाग समन्वयक सदानंद राऊत यांनी दिली.तर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती अजिंक्य मेडशीकर यांची होती.



