24ऑगस्ट ला महाराष्ट्र बंद ची हाक.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर राज्यात वाढत चाललेल्या महिला अत्याचार आणि नुकतेच बदलापूरमध्ये तीन शालेय मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.उद्या होत असलेल्या महाराष्ट्र बंद मुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.जाणून घेऊया कि महाराष्ट्र बंद दरम्यान कोणत्या सेवा सुरु आणि कोणत्या बंद आरोग्य सेवा: राज्यात महाविकास आघाडीने उद्या बंद पुकारला असला तरी राज्यातील आरोग्य सेवा जसे की, क्लिनिक्स, रुग्णालये आणि मेडिकल्स नियमितपणे सुरू राहतील.सार्वजनिक वाहतूक: या महाराष्ट्र बंदला राज्य सरकारचा पाठिंबा नाही. त्यामुळे राज्यातील एसटी, रेल्वे आणि सीटी बस सेवा सुरू राहणार आहे.दरम्यान महाराष्ट्र बंद दरम्यान काही ठिकाणी खाजगी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. यासह छोटे-मोठे व्यावसायही यामुळे बंद राहू शकतात.



