गोठ्याला लागली आग : झाले लाखों चे नुकसान

वाशिम जिल्हा प्रतिनिधि
अजय गायकवाड
मालेगाव ता :-१८ मालेगांव तालुक्यातील अमानी येथिल चंदु राम निंबालकर, नारायण देवराज निंबालकर, व संजय कोंडबाराव सरनाईक या शेतकरी यांच्या गावालगत असलेल्या गोठ्याला आग लागल्याने गोठ्या मधिल 10 ते 15 बकरी चा आगीत मृत्यु झाला तर या गोठ्यातील शेती उपयोगी लाकडी ओजारी खाक झाली ,ही घटना 17 आगस्ट रोजी रात्री 9 वाजता घडली, आगीचे कारण मात्र काही कळू शकले नाही, या शेतकरी यांच्या लोखो रूपांयाचे नुकसान झाले असुन नुकसान भरपाईची मागनी होत आहे, या संदर्भीत तलाठ्यानां माहीती मिलताच रात्री घटना स्थली येवुन प्राथमिक अवाहाल तयार केला, मंडल अधिकारी नागेश घुगे तलाठी जगन महल्ले, यांनी पंचनामा करुन अवाहाल सादर केला, चंदु निबालकर, यांच्या शेल्या मेल्या, व शेती उपयोगी साहित्य तसेच नारायण निंबालकर, संजय सरनाईक, यांचे सुध्दा गोठा मधिल कुटार, 10 कोंबड्या, टीन पत्रे, पाईप लाकडी, आवजारे आगीत जलुन खाक झाल्याने फार मोठ्या प्रमानात नुकसान झाले असुन गावकर्यानी गोठा विजवन्याचा प्रयत्न केला परंतु बकऱ्या , कोंबड्या, सह साहित्य पुर्नपने खाक झाले होते .





