“रिठद शाळेत माजी सैनिका तर्फे जिल्हा परिषद शाळेत मिस्टान्नाचे वाटप”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
रिसोड : – रिठद येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे गावातील माजी सैनिक प्रल्हाद देवबा आरु आणी जयाजी सखाराम बोरकर यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना दुपारचा आहार खिचडी वाटपा दरम्यान स्वखर्चाने मिष्ठांन्न जिलेबी सर्व विद्यार्थ्यांना दररोजच्या आहारासोबत वाटप करण्यात आले. माजी सैनिकांचे कार्य पाहून इतरांना याबाबत अन्नदान करण्याचे कार्य मनामनात निर्माण व्हावेत. या अपेक्षेने हे कार्य केले आहे. देशसेवेच्या सेवानिवृत्ती नंतरही हे कार्य सुद्धा जनहिताचे व जनतेसाठी कार्य सतत करत राहणार असे बोलतांना माजी सैनिक प्रल्हाद आरु व जयाजी बोरकर यांनी बोलतांना सांगितले. यावेळी दोन्ही मान्यवर माजी सैनीकांचा आणी उपस्थित नारायण आरु, तालुका प्रमुख शिवसेना, यांचाही सत्कार शाळेचे मुख्याध्यापक इंगळे,मापारी,साबळे यांनी केला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज इंगळे, सौ.आशाबाई बोरकर ,किसन साबळे, मदन आरु, गजानन मापारी, बाळकृष्ण बोरकर, ज्ञानबा आरु इत्यादी शिक्षक वृंद आणी शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.



