Uncategorized

आंतरराष्ट्रीय ट्रम्पोलिन जिम्नास्टिक प्रशिक्षण शिबिरा करिता संपूर्ण भारतातून राहुल पहूरकर सर यांची ताश्कंद (उज्बेकिस्तान) येथे निवड

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

दिनांक 1४ ते १८ऑगस्ट २०२४ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ट्रम्पोलिन जिम्नास्टिक प्रशिक्षण शिबिरा करता जिम्नास्टिक फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत श्री राहुल पहुरकर सर यांची संपूर्ण भारतातून निवड करण्यात आली आहे .या कोर्स साठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक महासंघाकडून नियुक्त प्रशिक्षक दिमटी पोलरीश हे प्रशिक्षण देणार आहेत.
महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय शेटे सर ,सचिव डॉ मकरंद जोशी सर, आंतरराष्ट्रीय पंच श्री प्रवीण ढगे सर, ट्रॅम्पोलिन चे टेक्निकल डिरेक्टर श्री पवन भोईर सर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री बाळकृष्ण मानकर सर , तालुका क्रीडा अधिकारी श्री लक्ष्मी शंकर यादव सर,श्री संत गजानन महाराज शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा आणि दि बुलढाणा डिस्ट्रिक्ट जिम्नास्टिक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या कडून श्री राहुल पहुरकर सरांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा .
परत एक वेळ असे सिद्ध झाले कि विजय नेहमी सत्याचाच होतो
पहुरकर परिवार हे अतीशय गरिब कुटुंबातील असुन आज दोन्ही भावंडांनी आई वडीलांच्या संघर्षाचा डंका पुर्ण देशात वाजवीला राहुल पहुरकर हे शिक्षक पेक्षाचे असुन मनोज पहुरकर हे सेन्टर रेलवे मध्ये काम करतात पण आज त्यांची ओळख body builderम्हणुन आहे या क्षेत्रात त्यांनी चांगलीच कौतुकास्पद कामगीरी केली व त्याना विविध प्रकारचे पदक देऊन गौरविण्यात आलेले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button