बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा येथील सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी मधुकरराव भिकाजी डोंगरे यांचे निधन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.

तेल्हारा दि.१३ ऑगष्ट ;
स्थानिक तेल्हारा शहरातील आई तुळजाभवानी चौक येथील सुधाकर मधुकर डोंगरे , प्रभाकर मधुकर डोंगरे , दिनकर मधुकर डोंगरे यांचे वडील , शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक ,सेवा निवृत्त महाराष्ट्र पोलीस कर्मचारी श्री. मधुकरराव भिकाजी डोंगरे यांचे रविवार दि.११ ऑगष्ट २०२४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पच्छात पत्नी , तिन मुले , तिन सुना , व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

स्व. मधुकरराव भिकाजी डोंगरे यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये तब्बल ३५ वर्ष प्रामाणिक सेवा दिली. स्वर्गीय मधुकरराव भिकाजी डोंगरे यांच्या जाण्याने संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. डोंगरे परिवारावर कोसळलेलं हे दुःखाचं डोंगर असून त्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो हि प्रार्थना.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस परिवार तर्फे मृत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button