सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संभाजीनगर येथे क्रांती दिनी होणाऱ्या आक्रोश मोर्चात सामील व्हा ! ; राजेश पाटील खारोडे ,प्रहार अकोला जिल्हा महासचिव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.०८ ऑगस्ट ;
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली विधवा , दिव्यांग वृद्ध , शेतकरी , अनाथ यांच्या विविध मागण्या घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार क्रांती दिन म्हणजेच ०९ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यस्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रहार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावं व आपल्या हक्काचे आपण साक्षीदार व्हावं असे आव्हान अकोला जिल्ह्याचे प्रहार चे जेष्ठ नेते तथा महासचिव राजेश पाटील खारोडे यांनी केले आहे.
येत्या दि. ०९ ऑगस्ट शुक्रवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात विभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . या मोर्चात राज्यभरातील प्रहारसेवक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत मोर्चातील प्रमुख मागण्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने मंजूर करून त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी , पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे रोजगार हमी किंवा एम.आर.इ.जी.एस अंतर्गत ३.५ योजनेत राबविण्यात यावी तसेच फळबाग व भाजीपाल्यांसाठी स्वातंत्र्य धोरण प्रभावी संत्र , आंबा , काजू , केळी , द्राक्ष पिकांसाठी विशेष व कांद्याला हमीभाव देऊन नाफेडचा हस्तक्षेप बंद करावा , कांदा निर्णायक बंदी संदर्भात स्वातंत्र्य धोरण असावे , शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील दोन वर्षासाठी कर्जाचा मुद्दल व व्याजात ५० % माफी देण्यात यावी , वान प्राण्यापासून शेतीच्या बचावासाठी शेत कुंपण योजना तयार करून तत्काळ अंमलबजावणी करावी, शासनाच्या नवीन धोरणानुसार ऊसाला रिकवरी प्रमाणे एफ.आर. पी दिल्या जावो परंतु कारखान्यादार दर कमी करण्यासाठी रिकवरी धोरणाचा प्रकार करतो त्यावर आळा घालण्यासाठी तात्काळ धोरणात्मक उपाययोजना कराव्या, शेतकरी गटाला कारखान्यापासून ठराविक अंतरावर वजन काटा उभारण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे आणि कारखान्याकडून जी काटेमारी चालू आहे ती तत्काळ थांबवावी , शेतमजूर प्रकल्पग्रस्त , खाजगी वाहन चालक , ग्रामीण पत्रकार , प्रेस फोटो ग्राफर यांच्याकरिता स्वातंत्र्य महामंडळ तयार करावे किंवा तातडीने कल्याणकारी योजना आखाव्यात , घरकुल साठी पाच लक्ष रुपये (५,०००००/- )निधी असावा शहर आणि ग्रामीण भागात समान निधी देण्यात यावा, शहरातील झोपडपट्टी धारकांना व बेघरांना स्वयंपूर्ण विकासापासून हक्काचे घर देण्यात यावे , बेघरांसाठी स्वातंत्र निवारा योजना तयार करावी, मुंबईतील नऊ फारशी व्यापाऱ्यांनी अडकलेली सहा हजार (६०००) एकर जमीन अर्बन सिलिंग प्रोजेक्ट अंतर्गत शासन जमा करावी दिव्यांगांसाठी प्रतिमाह ६०००/- रुपये सामाजिक सुरक्षा वेतन स्वातंत्र्य , घरकुल योजना , स्टॉल धोरण , म्हाडाचे पाच टक्के (५%) आरक्षण दिव्यांग वित्त महामंडळ कर्जमाफी व विमा तसेच अंतोदय योजनेचा लाभ देण्यात यावा, दिव्यांग्यांसाठी स्वातंत्र्य विद्यापीठ सुरू करावे , सारथी व बार्टी धर्तीवर दिव्यांग्यांसाठी स्वातंत्र्य संत गाडगेबाबा प्रशिक्षण महामंडळ देण्यात यावे . कंपनी कामगार , हॉटेल कामगार , कंत्राटी कामगार यांना किमान वेतन देण्यात यावे , कामावरून कमी करण्याच्या अधिकारासाठी समिती अभावी सर्व कामगारांना बांधकाम कामगाराप्रमाणे सुविधा देण्यात यावे , अंगणवाडी सेविका . आशा वर्कर , रोजगार सेवक , संगणक परिचालक , सुरक्षारक्षक , होमकार्ड , अर्धवेळ कर्मचारी , वाहन चालक ,एस.टी. कर्मचारी , उमेद महिला बचत गट , विद्युत कामगार कंत्राटी कर्मचारी यांना किमान १५ हजार रुपये वेतन देण्यात यावं . शहिद परिवार ,माजी सैनिक हुतात्मा स्मारक व गड किल्ल्यांसाठी स्वातंत्र्य धोरण जाहीर करावे. चाळीस (४०) एकरामध्ये असलेल्या राज्यपाल बंगल्याचा लिलाव करून त्यातून येणाऱ्या पैशातून कष्टावर जगणाऱ्या लोकांसाठी योजना राबवावी हे सर्व लोकहितार्थ सर्वसामान्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडूला क्रांतीदिनी वेगळा निर्णय सरकारच्या विरोधात घ्यावा लागेल अशी भूमिका आमच्या आदरणीय संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी घेतली आहे. आक्रोश मोर्चा करिता महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जंजाळ अमरावती जिल्ह्यातील बच्चू भाऊंची टीम तसेच महाराष्ट्रातील पदाधिकारी मोर्चे बांधणी करिता विविध स्तरावर सभा घेत आहेत अकोला जिल्ह्यातून विविध सेलचे पदाधिकारी मोर्चा करिता मोर्चा बांधणी करून विविध गावातून मोर्चात सामील होण्यासाठी आपली तयारी करत आहेत. दि.०९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त प्रहार सेवक , शेतमजूर विधवा महिला , पुरुष यांनी मोर्चात जाण्यासाठी कंबर कसली आहे असे निवेदनाद्वारे प्रहार चे ज्येष्ठ नेते अकोला जिल्हा महासचिव राजेश पाटील खारोडे यांनी कळविले आहे✍️.



