कावड बंदोबस्त सबंधी गांधीग्राम पुर्णा नदी येथे बच्चन सिंग पोलीस अधिक्षक, यांची भेट..

अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे
अकोट:तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या गाधीग्राम येथे
दि. ०५/०८/२०२४ रोजी दुपारी २ वाजता सुमारास
बच्चन सिंह पोलीस अधिक्षक, यांनी पोलीस स्टेशन दहिहांडा अंतर्गत ग्राम गांधीग्राम येथे भेट दिली त्यावेळी अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट, व पुरूषोत्तम ठाकरे ठाणेदार पो. स्टे. दहिहांडा हे हजर होते. पोलीस अधिक्षक यांनी कावड पालकी उत्सवाचे अनुषंगाने गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पात्राचे परीसराची बंदोबस्ताचे दृष्टीने पाहणी केली तसेच पोलीस अधिक्षक यांनी शिव भक्त व स्थानिक नागरीकांना कावड पालकी उत्सव शातंतेत पार पाडण्याकरीता तसेच उत्सवा दरम्यान पोलीसांनी दिलेल्या सुचनाचे अंमलबजावणी करण्या करीता आवाहन केले .व सदर चा बंदोबस्त शांतता व सुव्यवस्थेत पारपाडण्या सबंधी आवश्यक सुचना दिल्या



