अपघातजळगावा जिल्हानैसर्गिक

जोरदार शॉक लागल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी | ३ ऑगस्ट २०२४

शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावत असतांना विजेचा जोरदार शॉक लागून संजय बापू पाटील वय ४२, रा. धानवड, ता. जळगाव यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी उमाळा शिवारातील त्यांच्या शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकरी संजय पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचे उमाळा शिवारात शेत असून त्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचलेले होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास संजय पाटील हे पत्नी, वहिनी व पुतणीसह शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी गेले होते. शेतातील विहरीजवळ लावलेली मोटार सुरु करण्यासाठी संजय पाटील हे त्याठिकाणी गेले असता, त्यांना विजेचा जोरदार शॉक लागून ते शेतात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शेतात विजेचा शॉक लागून संजय पाटील यांचा मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी व पुतणे असा परिवार आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button