बुलढाणामहाराष्ट्र

मा.समाधानजी सोनवणे तहसीलदार तेल्हारा यांचे नागरिकांना आवाहन! “महसूल सप्ताहा”मध्ये घ्यावा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

दि.१ ऑगस्ट ; महसूल विभागामार्फत राज्यात आज पासून म्हणजेच दि.१ ऑगस्ट “महसुल दिन” ते दि.७ ऑगस्ट २०२४ पर्यंत “महसूल सप्ताह २०२४” राबविण्यात येत आहे.
या निमित्त कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहीम, कार्यक्रम , उपक्रम , शिबीरे , महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी शासनाच्या विविध कल्यानकारी योजनांचा तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे तरी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तेल्हारा तालुक्याचे तहसीलदार मा.समाधानजी सोनवणे यांनी केले आहे .


महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दि.२४ जुलै २०२४ नुसार दरवर्षी प्रमाणे १ ऑगस्ट हा दिन महसूल दिन म्हणून साजरा होत आहे तसेच या वर्षी महसूल दिनापासून म्हणजेच १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत “महसूल सप्ताह २०२४” साजरा करण्यात येत आहे.

त्यानुसार या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी पुढील प्रमाणे विशेष मोहीम, कार्यक्रम , उपक्रम , शिबीरे , महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येत आहे. चालू आसलेल्या महसूल सप्ताहामध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

दि.१ ऑगस्ट २०२४ ला “महसूल दिन साजरा करणे व महसुल सप्ताहाचा शुभारंभ” तसेच “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीन योजना” , दि.२ ऑगस्ट ला “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, दि.३ ऑगस्ट ला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”, दि.४ ऑगस्ट ला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय , दि.५ ऑगस्ट “सैनिक हो तुमच्यासाठी” ,
दि.६ ऑगस्ट ला “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा ” व महसूल सप्ताहाच्या अंतिम दिनी म्हणजेच दि.७ ऑगस्ट ला “महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताहाची सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी तेल्हारा तालुक्यातील सर्व नागरीकांनी दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या “महसूल सप्ताह २०२४” मध्ये राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध कल्यानकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.समाधान सोनवणे तहसिलदार तेल्हारा यांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button