आ. अँड. आकाश फुंडकर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना केले अभिवादन

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
खामगांव::- स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य टिळक यांना तसेच जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आ अँड आकाश फुंडकर यांनी अभिवादन केले.
आज दि . 1ऑगस्ट रोजी स्थानिक भाजपा कारला सदर अभिवादन कार्यक्रम पार पडला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने हा अभिवादन
कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम खामगाव मतदार संघाचे लाडके आ. अँड आकाश फुंडकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व पुष्पहार अर्पण करून त्यांना मनोभावे अभिवादन केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, भाजपा खामगाव विधानसभा मतदारसंघ विस्तारक डॉ एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष विलास काळे, शांताराम बोधे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव राम मिश्रा, युवा मोर्चा मतदारसंघ प्रमुख पवन गरड, पंचायत समिती माजी उपसभापती तुषार गावंडे,ज्येष्ठ नेते माधवराव कांबळे, शालिग्राम मानकर, अशोक हत्त्तेल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राज टिकार पाटील, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष प्रतीक मुंडे, यश आमले , गोलू आळशी, प्रसाद यदलाबादकर, रवी गायगोळ,अमोल राठोड गजानन मुळीक राहुल धनोकार विकी हत्तेल, गोपाल मानकर, संदीप राजपूत, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



