क्रिडाजळगावा जिल्हा

दोन दिवशी नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत क्ले बॉक्सिंग क्लब ने चॅम्पियनशिप क्ले बॉक्सिंग क्लबचे घव घवीत यश.

प्रतिनिधी प्रमोद सौंदडे

क्ले बॉक्सिंग क्लबचे घव घवीत यश. A.S.A बॉक्सिंग अकॅडमी यांच्यावतीने जळगाव जिल्हा मध्ये दोन दिवशी नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत क्ले बॉक्सिंग क्लब ने चॅम्पियनशिप आपल्या ताब्यात केली सदर ही स्पर्धा भुसावळ तालुका येथे संपन्न झाली या स्पर्धे नाशिक विभागातून 200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता तसेच नाशिक विभागातून धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, असे चार जिल्हे या बॉक्सिंग स्पर्धेत करिता आले होते जळगाव जिल्ह्यात तालुका भुसावळ मध्ये चालत असलेल्या क्ले बॉक्सिंग क्लब यांचे चॅम्पियनशिप आपल्या नावे केली तसेच क्ले बॉक्सिंग क्लब चे बॉक्सर यांनी अति उत्तम प्रकारे बॉक्सिंग खेळाचे प्रदर्शन करत 26 सुवर्ण पदक तर 17 रोप्य पदक मिळवले व अनिल सपकाळे लखन जंजाळे यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मानचिन्ह देऊन सन्मानित केले या खेळाडूंच्या मागे त्यांचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाट, संदीप वाघ, अनिल सपकाळे, लखन जंजाळे, सागर तायडे, पवन पारदे, यांनी मेहनत घेतली तसेच क्ले बॉक्सिंग क्लबचे सदस्य लाला सुरवाडे, अनिल जंजाळे, अतुल महालकर, बुरा भाऊ सपकाळे, दीपक सपकाळे, राजेश दांडगे, बबलू नेटकर, गिरीश पोद्दार, सतीश शिरसाट, विशेष सहकार्य म्हणून जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटने चे सदस्य या सर्वांनी खेळाडूंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button