Uncategorized

“रिठद येथे सेवापुर्ती सोहळा संपन्न”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – रिठद जिल्हा परिषद शाळेतील श्री विजय तुळशीराम बोरकर यांनी शिक्षक या पदावर काम केले. विजय बोरकर मनाने निर्मळ असून आपल्या शिक्षकी पेशाला साजेसे असं काम करून शिक्षक या पदावरून ऐच्छिक सेवानिवृत्त होत आहेत आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताचे दिवशी मुलांच्या सेवेतून मुक्ती घेऊन समाजाच्या कामासाठी कुठेतरी हातभार लागावा या उद्देशाने आज त्यांचा स्वेच्छा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम संत गजानन महाराज सभागृह येथे संपन्न झाला. गुरु पौर्णिमेच्या पर्वावर स्वेच्छापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाला संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन व पूजन मान्यवरांचे हस्ते करून सुरुवात झाली.शिक्षक संघटनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी कालीदास माने सर,आलमने सर,तथा शिक्षक वृंद,राष्ट्रवादीचे बाबाराव पाटील खडसे, नकुल देशमुख, डॉ. राम शिंदे, माजी सभापती भगवानरावजी गोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील कव्हर, आमदार अमित पाटील झनक, आमदार भावनाताई गवळी, शामराव उगले, विष्णुपंत भुतेकर, बाळासाहेब खरात, गजानन पाचरणे, सभापती बंडू हाडे, सभापती मधुकर काळे, दिलीपरावजी देशमुख,सौ.देशमुख, सुभाषराव शिंदे, विजय खानझोडे, राजू चौधरी, रामेश्वर नरवाडे, डॉ .देवळे,दिलीपजी जोशी,ग्यानदेव भुतेकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. काही मान्यवर हिंगोली बुलढाणा अकोला जिल्ह्यातील हितचिंतक या कार्यक्रमासाठी आले होते. व सर्व मान्यवरांनी विजय बोरकर या शिक्षकाचा गुणगौरव करून पुढील भविष्यासाठी व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्यात.बाहेरगावची व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होती.आणी कार्यक्रम स्थळी मान्यवरासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे संचालन संजय सुरेकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ यु.टी.बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख हनुमान बोरकर सर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button