मालेगाव दिगंबर ऋषभनाथ जैन मंदिर येथे प.पु.गणाचार्य राष्ट्रसंत उपसर्ग विजेता श्री 108 विरागसागर महामुनीराज यांना सामूहिक भावपूर्ण विनायंजली अर्पण

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – आज मालेगाव ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर येथे प.पु.गणाचार्य राष्ट्रसंत उपसर्ग विजेता श्री 108 विरागसागर महामुनी राज यांना सामूहिक भावपूर्ण विनायंजली अर्पण करण्यात आली मोठ्या संख्येने सकल दिगंबर जैन समाज ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर येथे उपस्थित होता. हुकुमचंद कान्हेड,सुभाष रोकडे,आणि भारती टिकाईत यांनी आचार्य गुरुदेव बद्दल मनोगत व्यक्त केले हुकुमचंद कान्हेड यांनी आचार्य श्रींच्या धार्मिक भावनेवर आणि त्यांच्या दिनचर्येवर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की,आचार्य श्री नेहमी भक्तांच्या सेवेसाठी तत्पर असत,सुभाष रोकडे यांनी आचार्य श्रींच्या अनुशासनबद्ध जीवनाची माहिती दिली आणि त्यांच्या सुसंस्कारांची महती मांडली,भारती टिकाईत यांनी आचार्य श्रींच्या आत्मसंयम आणि भक्तिप्रवणतेच्या उदाहरणांची चर्चा केली आणि त्यानंतर आचार्य गुरुदेव यांची आरती व अष्टक देऊन हा कार्यक्रम पार पडला मंदिरात दर्शन करीता येणारे भावी भक्तांनी आचार्य गुरुदेव यांना दर्शन घेऊन विनायंजलीअर्पण केली आचार्य श्रींच्या समाधी मरणामुळे जैन समाजावर दु:खाची लाट पसरली आहे गुरुवारी,देव मूर्ती गावात,मध्यरात्री अडीच वाजता त्यांचे समाधी मरण झाले होते अखिल भारतीय दिगंबर जैन समाजाच्या लाखोंच्या संख्येने लोकांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी हजेरी लावली होती.



