महाराष्ट्र
*सुधारितबलिदान दिन निमित्त आ अँड फुंडकर यांनी केले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

बलिदान दिन निमित्त आ अँड फुंडकर यांनी केले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन
- स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा प्रतीनीधी रामा इंदोरे
खामगाव ::- बलिदान दीन निमित्त आ अँड आकाश फुंडकर यांनी केले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केले.
स्थानिक भाजप कार्यालयात भारतीय जनसंघाचे संस्थापक काश्मीर साठी सर्वोच्च बलिदान देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दीन निमित्त स्मृती दीन साजरा करण्यात आला .यावेळी सर्वप्रथम आ अँड आकाश फुंडकर यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व विनम्र भावे अभिवादन केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, ज्ञानदेव मानकर ,खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे विधानसभा विस्तारक डॉ. एकनाथ पाटील ,तालुकाध्यक्ष विलास काळे, डॉ. गोपाल गव्हाळे ,पुंडलिक बोंबटकार, युवा मोर्चा विधानसभा संयोजक पवन गरड युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राज टिकार , पंचायतराज पश्चिम विदर्भ संयोजिका सौ रत्नाताई डिक्कर, बेटी बचाव जिल्हा संयोजिका सौ जानवीताई कुलकर्णी, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष शिवानी ताई कुलकर्णी, खामगाव अर्बन बँक संचालिका सौ मनीषा माटे,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष प्रतिक मुंडे, वैभव डावरे ,वसंता वानखडे ,अशोक हट्टेल, नंदकिशोर खांडेकर, सौ श्रद्धा धोरण, सौ भक्ती वाणी ,सौ पूजा वराडे, सौ ज्योती पवार, शिवा आनंदे,गणेश गजगाने ,पवन डिक्कर ,रामेश्वर चततकार, ओम इंगळे, राजेश पाटील ,गौरव ठाकरे आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ.एकनाथ पाटील यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.



