Uncategorized

मौजे नेवरे येथे शेतकरी संवाद मेळावा

नेवरे – ( शहापुर ) सचिन शेलवले दिनांक १४/ ६ / २०२४ रोजी दुपारी ठिक 3.30 वाजता मौजे नेवरे येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता . या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी चेन्नईचे लेस्ली स्टिव्हन worldwide technology हे उपस्थित होते तसेच ग्रीन यात्रा फाऊन्डेशन चे अध्यक्ष प्रशांत पाटील सर हे सुद्धा उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन सचिन शेलवले व देविदास भोईर यांनी केले होते . वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे , पक्षी ही सुस्वरे आळविती या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे झाडे ही आपले मित्र आहेत . प्रत्येकानी एक तरी झाड लावले पाहिजे व जगवली पाहिजेत . दरवर्षी तापमानात वाढ होत आहे . झाडे कमी होऊ लागली आहेत . ऑक्सीजनचा साठा कमी होऊ लागला आहे . त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अवतीभवती झाडे लावली पाहिजेत . ग्रीन यात्रा फाऊन्डेशन संस्था दरवर्षी प्रत्येक विभागात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला मोफत झाडे वाटप करते . यामध्ये प्रामुख्याने केशर आंबा, चिकू, फणस, जांभुळ, काजू, कडुलिबू, पेरू, मुँह, इतर अशा नाना प्रकारची झाडे वाटप करण्यात येत असतात. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल . ऑक्सीजनचा साठा मुबलक होईल . वाढत्या तापमानात घट होईल . यासाठी यावर्षी सुद्धा ही संस्था मोफत झाडे वाटप शेतकऱ्यांना करणार आहेत . यासाठी खास करून शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी चेन्नईवरून प्रमुख पाहुणे म्हणून लेस्ली स्टिवन यांनी विशेष उपस्थिती दर्शविली . तसेच त्यांचे संवाद ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी मित्र तसेच महिला यांनी चांगला प्रतिसाद दिला . जवजवळ चाळीस शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून आम्ही यावर्षी झाडे लावू आणि जगवू अशी संमती दर्शविली . प्रशांत पाटील सरांनी सुद्धा ग्रीन यात्रा संस्थेचे कार्य थोडक्यात विशद केले . त्यानंतर महिला मिना बोंबे यांनीही झाडांविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले . त्यानंतर सर्वांचे आभार माणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button