Uncategorized

बुलढाण्यात मोठे कांड! कनिष्ठ लिपकाने केल्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या खोट्या सह्या..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा): जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कनिष्ठ लिपीक विशाल तेजराव वाघ याने शल्य चिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत वैद्यकीय बिलांमध्ये घोटाळा केल्याची खळबळ जनक बातमी समोर आली आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ. साईनाथ वसंतराव तोडकर यांनी शहर पोलिसांत काल रात्री उशिरा तक्रार दिली, १९ डिसेंबर २०२३ ते २०२४ या कालावधीत विशाल वाघ याने शल्य चिकित्साकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत तसेच खोटे जावक क्रमांक टाकून फसवणूक केली. काही आजारांच्या बिलांमध्ये शासन निर्णयात नमूद असलेले आजारांचा समावेश नसल्याने ही बाब उघडकीस आली. खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट देयके (बिले) तयार करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी विशाल वाघ याला अजून अटक करण्यात आली नाही. खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिलांमधून किती रुपयांचा घोटाळा झाला हे तपासून समोर येईल, सध्या तपास सुरू आहे या प्रकरणात आणखी किती घोटाळेबाज उघडकीस येतील हे देखील पाहावे लागणार असे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button