Uncategorized

मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी अस्थीरोग तज्ञाने लढवली शक्‍कल

जळगाव दि— येथील प्रसिध्द अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन ए धांडे यांनी मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी चक्‍क प्रिक्सीप्शनचा उपयोग केला आहे.
पारीकपार्क उद्यान येथे रूग्णांची तपासणी करतांना अस्थीरोग तज्ञ डॉ. नितीन धांडे हे स्वता मतदान करण्यासाठी रूग्णांना आवाहन तर करतच आहे पण घरी गेल्यावर विसर पडू नये म्हणून औषधी लिहून दिलेल्या केसपेपरवर मतदान हा आपला हक्‍क आहे त्याचा उपयोग करा मी मतदान करणार असे घोषवाक्य लिहून मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी प्रचार व प्रसार करीत आहे. हा केसपेपर मेडीकल स्टोअर्स व अनेक ठीकाणी हाताळला जात असल्याने डॉक्टरांनी ही नामी शक्‍कल लढवली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे वैद्यकिय क्षैत्रातून स्वागत केले असून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button