Uncategorized

डॉ.गो.खे.महाविद्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित समता सप्ताहाचा समारोप., विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा ; ओम कुलट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

दि.१७ : तेल्हारा येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव तेल्हारा येथे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान इतिहास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यातील ‘विद्यार्थ्यांचा परिसंवाद’ कार्यक्रमात बोलताना बी.ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी ओम कुलट यांनी वरील प्रतिपादन केले. विद्यार्थी दशेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ अखिल विश्वाला मिळाले. तशीच मेहनत करून आपण ही आपले जीवन समाज व राष्ट्रहितासाठी समर्पित करावे असे प्रतिपादन केले.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन व कार्याशी संबंधित विविध विषयावर परिसंवाद, प्रश्नमंजुषा, ग्रंथोत्सव साजरा करावा. असे निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार महाविद्यालयात भव्य अशी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाविद्यालय व परिसरातील 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित परिसंवाद कार्यक्रमात ओम कुलट, कु. शारदा गवई, कु. पल्लवी घाटोळ, उज्वल इंगळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलुवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णा माहुरे , प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रजनी बोबडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. उमेश इंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी भूषविले. वरील सर्व पाहुण्यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे विद्यार्थी होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध पैलूवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. धीरजकुमार नजान यांनी केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा व परिसंवाद यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वप्निल फोकमारे, सचिन ढोले, अभिजीत लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button