तेल्हारा शहरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी ! , भव्य दिव्य आकर्षक देखाव्यासह विविध प्रात्याक्षिकाने शांततेत पार पडला भिम जयंती ऊत्सव

*तेल्हारा शहरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी ! , भव्य दिव्य आकर्षक देखाव्यासह विविध प्रात्याक्षिकाने शांततेत पार पडला भिम जयंती ऊत्सव*तेल्हारा शहरातील भिम जयंती ऊत्सव ठरला २०२४ चा आदर्श सोहळा! महिला लेझीम ,लाठी-काठीचे उत्तम सादरीकरण,भीम नगर मंडळाचा भव्य-दिव्य आकर्षक कंटेनर वरील जयंती उत्सव देखावा पाहण्यासाठी उलटला जनसागर!स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडेतेल्हारा तालुका प्रतिनिधी दि.१५ ; तेल्हारा शहरात रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा यावर्षी १३३ वा जयंती ऊत्सव आनंदात साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त स्थानिक मिलिंद मंडळ , पंचशील मंडळ च्या वतीने तेल्हारा शहरात मुख्य चौकातील टॉवरच्या वास्तुला महामानवाची डिजिटल फ्लेक्स प्रतिमा लावण्यात आली तसेच सम्पूर्ण परीसरात निळे झेंडे फडकत्या पताका लावण्यात आल्या तसेच सकाळी भव्य मोटारसायकल मिरवणूक काढुन त्यामध्ये जय भीम नामाचा एकच जय घोष करण्यात आला होता त्यामुळे सम्पूर्ण शहर भिम मय झाले होते. दिवसभरा पासून विविध ठिकाणी ,विविध भागात विविध पक्ष , संघटना यांच्या कडून महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी लहानग्यांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत महामानवाला अभिवादन करण्यासाठी शेगाव नाका स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशोक वाटिका उद्यानात प्रचंड गर्दी जमली झाली होती.मिलिंद नगर तेल्हारा मंडळचे अध्यक्ष सचिन खिराडे,उपाध्यक्ष रोहित भारसाकळे यांच्या नेतृवाखाली सकाळी सामुहिक त्रिशरण ,पंचशील व बौद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर बसस्टँड परिसरातील महामानवाच्या प्रतिमेला हारार्पन करण्यात आले. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रज्ञावंत बुद्ध विहार येथे जाऊन वंदन करण्यात आले. सायंकाळी भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती, ढोल ताशे व डी.जे. च्या तालावर तरुणांनी आनंद उत्सव साजरा केला. भीमनगर मंडळाच्या वतीने अध्यक्ष करण पोहरकार,उपाध्यक्ष अजय पोहरकार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच कंटेनर मध्ये संदिप बोदडे मंडप डेकोरेटर्स कडून उत्कृष्ट सजावट करून भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीचा देखाव्यासह बाबासाहेबांच्या उच्च प्रतिमेचे संविधान बुकासह आकर्षक रोषणाईने विविध देखावे साकारण्यात आले होते. यावेळी तेल्हारा शहरात कंटेनर वरील जयंती देखाव्याची वार्ता पसरताच शहरातील नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती . भीमनगर मंडळाची शिस्त बद्ध भव्य रॅली काढण्यात आली मेन रोड मार्गे पोलीस स्टेशन समोरून टॉवर चौक मार्गे शेगाव नाका स्थित डॉ आंबेडकर उद्यानात पोहचली व तेथे रॅली चा समारोप करन्यात आला.कपिल वस्तू मंडळ जेतवन नगर च्या वतीने अध्यक्ष संतोष तायडे,उपाध्यक्ष राहुल तायडे, यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य बाबसाहेब आंबेडकर- रमाबाई आंबेडकर यांच्या देखाव्या सह वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. तेल्हारा शहरातील सिध्दार्थ मंडळाचे अध्यक्ष राहुल तायडे, उपाध्यक्ष विकास तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेची वाजत – गाजत मिरवणूक काढण्यात आली या रॅली मध्ये लहानग्यांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते भीमरत्न मंडळ तहसील रोड तेल्हाराच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरा मध्ये भव्य-दिव्य आकर्षक पद्धतीने भव्य मंच ऊभारुन महामानवाची आकर्षक मूर्तीं साकारण्यात आली यावेळी अध्यक्ष आकाश भोजने उपाध्यक्ष क्रांतीकुमार वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात आली.भीमशक्ती मंडळ इंदिरा नगर अध्यक्ष सुरज विलास पोहरकार, उपाध्यक्ष रोहन राजेश पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ एप्रिल जयंती साप्ताह राबविण्यात आला होता प्रथम ११ एप्रिल ला विद्यार्थ्यांना वही-पुस्तक-पेन-पेन्सिल चे वाटप करण्यात आले , १२ एप्रिल ला व्याख्यान , १३ एप्रिल ला मुलांना सर्व बहुजन महापुरुषांची ओळख , विचार सांगण्यात आले त्यानंतर १४ एप्रिल ला भव्य- दिव्य मिरवणूक काढण्यात आली यात विशेष आकर्षण म्हणून बाबासाहेब यांच्या पाळण्याच्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले होते.तेल्हारा शहरातील पंचशील मंडळाचे अध्यक्ष संतोष पोहरकर,उपाध्यक्ष सिध्दार्थ पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यात लेझीम नृत्य सादर करण्यात आले महिला मंडळाच्या वतीने लाठी- काठी ,लेझीम पथक,भौराव दांडपट्टा खेळ दाखविण्यात आले सर्वांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केलेसर्व मंडळाच्या मिरवणुका ह्या शांतेतेत व सुव्यवस्थित रित्या शहरातून मार्गक्रमण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उद्यान येथे पोचल्यावर महामानवाला अभिवादन करून सर्वांना मनीषकुमार तायडे यांनी सामुहिक त्रिशरण , पंचशील भिमस्तुती पठण केली यावेळीस्पर्धा परीक्षा मध्ये उत्तीर्ण होऊन सेवेत लागलेल्या विद्यार्थी नीता रवी अंभोरे, रतन नाना कुऱ्हाडे , शुभम हरीशचंद्र वानखडे,यांचा सत्कार करण्यात आला डॉ स्नेहा सुभाष सावंग हीचा एम.डी. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला यावेळी चिमुकली गुंजन शेषराव बोदडे हिने बाबासाहेब यांच्या नावाचा अर्थ सांगुन थोडक्यात माहिती दिली.२०२४ च्या या जयंती ऊत्सवात सहभागी सर्व मंडळांनी असाच एकोपा दरवर्षी कायम ठेऊन जयंती उत्सव साजरा करावा असे प्रतिपादन मनीष कुमार तायडे यांनी केले यावेळी सर्व मंडळाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचां सत्कार घेण्यात आला.मुस्लिम, हिंदू, अण्णाभाऊ साठे मंच बांधवांकडून विविध ठिकाणी शीतपेयाचे स्टॉल लावल्यात आले होते. तेल्हारा शहरात प्रथमच हिंदू मुस्लिम बांधवांकडून जश्ने ईद-ऐ -मिलादुन्नबी जुलूस कमेटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शीतल जल चे वाटप करण्यात आले.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विचार मंच च्या वतीनेही शरबत वाटप करण्यात आले ,अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेला विकास पवार मित्रपरिवार यांचे कडून आकर्षक रोषणाई व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंती रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्षांचा शाल, पुष्पहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा स्थापित सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर रोशन दारोकार मित्रपरिवार, यांचेकडून शीतपेयाचे वाटप करण्यात आले तसेच विविध ठिकाणी पाणी शीतपेय स्टॉल लावून या रॅली मधे सहभागी झालेल्या हजारो नागरिकांना त्याचा वाटप करण्यात आला यावेळी हिंदू मुस्लिम बौद्ध एकतेचे प्रचंड ,भव्य दर्शन या निमित्ताने पाहायला मिळाले.



