महाराष्ट्र

तेल्हारा तालुक्यात ईद उत्साहात साजरी . ईद निमित्त विविध धर्मियांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

दि.११ ; आज ईद असल्यामुळे सर्वत्र हा ऊत्सव आनंदात साजरा होत आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातही ईद उत्साहात साजरी करण्यात आली , सुरुवातिला मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त नमाज अदा केल्यानंतर एका ठिकाणी येऊन विविध धर्मातील बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देऊन ईद साजरी केली.
तेल्हारा शहरासह तालुक्यातील पचंगव्हाण , अडगाव , हिवरखेड , तळेगाव बाजार , माळेगाव , बेलखेड , दानापुर , भांबेरी ई.ठिकानच्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा एक महिना उपवास करून ईद निमित्त लहान मोठ्यांना नविन कपडे घेऊन सकाळी सकाळी मस्जिद मध्ये नमाज अदा करुन व एकत्र येऊन लहान मोठ्यांना शूभेच्छा देउन ईद उत्साहात साजरी केली. यावेळी तळेगाव बाजार येथील हिंदू बांधवांनी मुस्लिम समाजाला ईद निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी तळेगाव बाजार येथील माजी पोलिस पाटील भाऊसाहेब खारोडे , रामकृष्ण खारोडे ,अरुण पाटील , सदानंद खारोडे ,उद्धव मानखैर , हिम्मत खारोडे ,राजेंद्र पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक मुस्ताचाचा ,आदिलभाई तळेगाव बाजार येथील मजीद संस्थानचे अध्यक्ष रशिदभाई , शमाभाई , वायदभाई , अफरोज शा , कालुभाई , सिद्दिकभाई , हमिदभाई , मुजफ्फर , मतिनभाई , कदिरभाई , अनसारभाई , साजिद रफिक भाई , जम्मुभाई व गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ईद निमित्त तेल्हारा पोलिस स्टेशन चे ठाणेदार उलेमाले , हिवरखेडचे ठाणेदार पाडंव यांनी चोख बंदोबस्त ठेवला.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button