रिवाइंडिंग दुकान फोडल; ५७ह, चा माल लंपास!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिध
प्रकाश दांडगे जळगाव जामोद
( सोनाळा): येथे मुख्य रस्त्यावर जि.प. मुलांच्या शाळेलगत ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. यातील १०व ११ क्रमांकाचे मोटर रिवायडींग दुकान
व ऑटो गॅरेज दुकान अज्ञान चोरट्यांनी फोडून त्यातील दुरुस्तीसाठी आलेले
75 हजार रुपयाचे किमतीचे शेती पंप दुकानाचे कुलूप फोडून लंपास केल्याची घटना शुक्रवार 22 मार्च चे पहाटे सात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.मोटर रिवायडींग दुकानदार गोपाल शामलाल मावत लाल यांच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन सोनाळा येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७,३८० कलम बांधविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, मोटर रिवायडींग दुकानाच्या लगत असलेले सुगम ऑटो गॅरेज चे मालक नंदकिशोर शालिकराम रोहन कार हे सकाळी गॅरेज उघडण्यास आले असता दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. तर मोटर दुरुस्ती दुकानाचे कुलूप तोडून गीता १० हॉर्स पावर च्या दहा पावरच्या रिवायडींग समर्सिबल एसी ऑन पाच हॉर्स पावर असे एकूण 57000 चे मोटर पंप चोरीला गेल्याचे आढळून आले. सोनाळा मुख्य बाजारपेठ सोनाळा हिवाळखेड रस्त्यावर आहे. येथे सोनाळा पोलिसांच्या नाकावर टिचून ही चोरी झाली आहे. यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेणे सोनाळा पोलीस समोर आव्हानच आहे.



