Uncategorized
उषा चव्हाण.

उषा चव्हाण यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४६ साली आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या गावी झाला. चित्रपटात येण्याअगोदर उषा चव्हाण यांची तमाशा पार्टी होती. पुढे त्या नाटकातून भूमिका करू लागल्या. ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ हे त्यांचे अरुण सरनाईक यांच्याबरोबर काम असणारे नाटक गाजले होते. नायिका म्हणून ‘केला इशारा जाता जाता’ या पहिल्याच चित्रपटात त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्यकौशल्याने साऱ्या प्रेक्षकवर्गाला जिंकले होते.
उषा चव्हाण यांना हा चित्रपट मिळाला, हा निव्वळ योगायोग होता. अनंत माने यांनी आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्यसमूहातून नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली. उषा चव्हाण या आधी ‘सवाल माझा ऐका’ चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे कोरसमध्ये नाचल्या होत्या.
अनंत माने यांनी जेव्हा उषा चव्हाण यांना काम करण्याबाबत विचारले, तेव्हा ‘मागच्यासारखं नाचाचं काम असणार ना? पण या वेळी मी दिवसाला १५ रुपये घेऊन काम करणार नाही. २० रुपये घेईन’ असे बजावले. त्यावर माने म्हणाले, ‘अगं, तुला या वेळी मागे नाचायचं नाही, तुला या चित्रपटात नायिका म्हणून



