मुक्ताईनगरमध्ये अवैध विमल गुटख्याची तस्करी सुरूच; शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यातमुक्ताईनगर,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगरमध्ये अवैध विमल गुटख्याची तस्करी सुरूच; शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यातमुक्ताईनगर,
ता. ३० ऑगस्ट:शहरामध्ये दिवसेंदिवस अवैध विमल गुटख्याची तस्करी वाढत चालली असून, त्यामुळे विशेषतः शाळकरी मुलांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. विमल गुटख्यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाचे अहवाल दर्शवतात.दररोज सकाळी व रात्रीच्या सुमारास विमल गुटख्यांनी भरलेली मोठमोठी वाहने मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत असून, पूर्णाड फाट्या मार्गे या गाड्या जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, जामनेर, संभाजीनगर या भागांत पोहोचविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.स्थानिक नागरिकांत या प्रकाराबाबत तीव्र संताप असून, “पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे?” असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?अन्न व औषध विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, यामध्ये काही अधिकाऱ्यांचे संलयन असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. नागरिकांचा सवाल असा आहे की, “वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष जाईल का? की हा प्रकार ‘मांजराने दूध पिण्याचा’ ठरणार आहे?”शाळकरी मुलांमध्ये वाढती सवयगुटख्याची सहज उपलब्धता आणि स्थानिक विक्रेत्यांकडून खुलेआम विक्रीमुळे शाळकरी व तरुण पिढी या विळख्यात अडकत चालली आहे. आरोग्य विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास, भविष्यात कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कारवाई होणार कधी?स्थानिक प्रशासन आणि पोलीस खात्याने या अवैध तस्करीवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा ही तस्करी आणखी वाढेल आणि त्याचे परिणाम समाजावर व आरोग्यावर दीर्घकाळासाठी भोगावे लागतील.



