स्वतःच्या आईच्या तोंडावर फेकला उकळता चहा!भांडकुदळ महिला विरुद्ध गुन्हा दाखल; मोताळ्याची घटना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
लवकर चहा पिऊन घे, मला शेतात जायचे आहे असे म्हटले म्हणून मुलाने आईच्या तोंडावरच चहाचे पातेले फेकून मारले अशा तक्रारीनुसार बोराखेडी पोलीस ठाण्यात संघपाल इंगळे यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोताळा तालुक्यातील शिरवा येथील पुष्पा अशोक इंगळे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता त्यांचा मोठा मुलगा संघपाल याला चहा दिला व लवकर पे मला शेतात जायचे आहे असे म्हटले, मात्र यात शिल्लक कारणावरून संतप्त झालेल्या संघपालने स्वतःच्या आईच्या तोंडावरच गरम चहाचे पातेले फेकून मारले. इतकचं नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यात त्या जखमी झाल्या, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलढाणा येथे उपचार सुरू होते. याप्रकरणी पुष्पा इंगळे यांच्या तक्रारीवरून बोरखेडी पोलिसांनी संघपाल इंगळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.



