Uncategorized

श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात अवतरले

श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात अवतरले पंढरपूरवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव -: आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आज ता 30 जून रोजी मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरातील विद्यार्थी विद्यार्थिनी श्री विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्या मंदिरात आल्या होत्या त्यामुळे तिथे पंढरपूर अवतरल्या च भास होत होता परिसरात त्यांच्या दिंडीने वातावरण भक्तीमय झाले होते आषाढी एकादशी ता 29 जून रोजी साजरी करण्यात आली आज द्वादशीला विद्यार्थी विद्यार्थिनी श्री विठ्ठल रुक्मिणींच्या वेशभूषेत शाळेत आले होते त्यांच्या हाती भव्य पताका होत्या डोक्यावर काही विद्यार्थ्यांनिनी तुळशी वृंदावन घेतले होते टाळांच्या गजरात व हरि हरिनामाच्या गजरात परिसरातून दिंडी काढण्यात आली यावेळी विद्यामंदिराचे व्यवस्थापक कपिल भालेराव मुख्याध्यापिका रंजना कांबळे, शिक्षिका स्मिता गवई ,पूजा दायमा ,स्वाती सुरडकर ,माधुरी डहाळे ,लक्ष्मी बोरकर ,पूजा मोरे ,सुजित अवचार ,उन्नती सोनवणे आणि सेविका राधाताई काळे आधी सहभागी झाले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button