क्राईममहाराष्ट्र

राहुरी पोलिसांची दादागिरी,,,भर चौकात करतात सर्वसामान्यांना हाणमारी,,,,

अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे. परंतु या मोहिमेंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ व वर्दीच्या गैरवापर करताना दिसत आहेत.अशीच घटना राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रोडवर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडली.आज दिनांक रविवार 2 मार्च 2025 रोजी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असणाऱ्या जिजाऊ चौकामध्ये घडलेली घटना बघून त्या परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकांनी चक्क आश्चर्य व्यक्त केले. झाले असे की राहुरी पोलीस स्टेशनचे ट्राफिकचे काही पोलीस कर्मचारी या चौकामध्ये कर्तव्य बजावत असताना या ताफ्यातील काही कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसले मुळात ट्रॅफिक हवालदार किंवा ट्रॅफिकचे कर्मचारी यांनी यांच्या नियमाने काम करणे गरजेचे आहे जर विना नंबर गाडी, विना हेल्मेट चालक,विना कागदपत्रे असणाऱ्या गाड्या जर आढळल्या तर सदर गाड्यावर व व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार दंड आकाराने किंवा गुन्हा दाखल करण्याचे काम करावयाचे असते परंतु आज वेगळे दृश्य सर्वसामान्य जनतेला पाहावयास आले.या परिसरात काम करणारे पोलीस ट्राफिक चे कर्मचारी जालिंदर धायगुडे, फुलमाळी,ठोंबरे व इत्तर पोलीस कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या धरून त्यांना हाना-मारी करतानी सर्वसामान्य लोकांनी बघितले.अक्षरशः सर्वसामान्य लोकांच्या ते गचंडी धरताना आढळले गचंडी धरून त्यांच्याच गाडीवर बसून त्यांना पोलीस स्टेशन किंवा इतरत्र घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांनी बघितले. हा सर्व प्रकार एका चौकात घडल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात बग्याची यांची गर्दी जमली. बऱ्याच नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला थोडक्यात राहुरी तालुक्यात होत असणारी पोलिसांची दादागिरी याला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आवर घालून दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणार की या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार? अशी चर्चा त्या परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये चालू होती.यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केल्या आहेत त्यानि म्हंटले आहे की राहुरी शहरामधून मोठया प्रमाणात अवैध वाहतूक होते या मध्ये राहुरी -मांजरी, राहुरी -वांबोरी, राहुरी -श्रीरामपूर, राहुरी-शिर्डी, राहुरी -अहिल्यानगर, राहुरी – ताहाराबाद अशी मोठया प्रमाणात राजरोसपने अवैध वाहतूक चालते या अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांकडून हे पोलीस कर्मचारी जालिंदर धायगुडे, पोलीस हवालदार फुलमाळी, पोलीस हवालदार ठोंबरे हे मोठया प्रमाणात माया जमा करतात असा त्यांनी आरोप केला.अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून या हप्तेखोर व सर्वसामान्याला त्रास देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे.

राहुरी प्रतिनिधी: दत्ता जोगदंड

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button