हिवरखेड येथेअज्ञात आजारामुळे ४० मेंढऱ्या दगावल्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील अज्ञात आजारामुळे पाच मेंढपाळांच्या ४० मेंढ्या दगावल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मेंढपाळांमध्ये एकच खळबळ उडाली असून गावात नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवरखेड गावात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव वास्तव्यास आहेत. त्याठिकाणी अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या
संख्येने मेंढ्या असून मेंढपाळांची संख्याही मोठी आहे. हिवरखेड गावात अज्ञात आजाराने डोके वर काढले असून या आजाराच्या संपर्कात येवून गावातील सुरज हटकर, शिवाजी गुलाब पारके, प्रफुल्ल गुलाब हटकर, सुभाष
बळीराम कोळपे, बळीराम गंगाराम काळपे या सर्व शेतकऱ्यांच्या सुमारे ४० मेंढ्या दगावल्या आहेत. याठिकाणी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी भेट देवून घटनास्थळीच दोन मेंढ्यांचे शवविच्छेदन केले आहे. तसेच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील खरे कारण समजणार आहे. या घटनेने मात्र मेंढपाळांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.



