हिंदवी परिवाराची पन्हाळा-पावनखिंड मोहीम यशस्वी,मालेगावातील शिवभक्तांचा विशेष सहभाग

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – राष्ट्रप्रथम वंदे मातरम या बोधवाक्याने प्रेरित हिंदवी परिवाराची दरवर्षी होणारी गडकोट पदभ्रमंती मोहीम यंदा पन्हाळा ते पावनखिंड असा तीन दिवसांचा प्रवास करून यशस्वीपणे संपन्न झाली या मोहिमेत मालेगावातून अनिल सोळंके,विजय भुरकाडे,रवी वानखेडे,मनोज निकम यांच्यासह ४ शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता या वर्षीच्या मोहिमेत ४७५ शिवभक्तांनी आपला सहभाग नोंदवला,ज्यामध्ये ७३ महिलांचा समावेश होता. सोलापूर शहर व जिल्ह्यातून १९० शिवभक्तांनी,तसेच अहमदनगर,अकलूज,अकोला, अमरावती,बीड,भुसावळ,बुलढाणा, जालना,मंगळवेढा,वाशीम,मिरज, नागपूर,नाशिक,शेवगाव,पुणे,राहुरी, फलटण,कोल्हापूर,ठाणे अशा विविध ठिकाणांहून असंख्य शिवभक्तांनी मोहिमेत सहभागी होत,या ऐतिहासिक मोहीमेचे महत्त्व अधोरेखित केले मोहीम पन्हाळा येथील पुसाटी बुरुज येथे नरवीर शिवा काशीद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झाली. या मोहिमेचा समारोप काडसिद्धेश्वर महास्वामीजींच्या उपस्थितीत सिद्धगिरी मठ कणेरी,कोल्हापूर येथे झाला या प्रसंगी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवरत्न शेटे यांनी या मोहिमेच्या भौगोलिक मार्गाचे ऐतिहासिक महत्त्व व शिवरायांच्या पन्हाळा किल्ल्यावरून सुटकेचा प्रसंग, शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान याविषयी उपस्थितांना संबोधित केले मोहीम यशस्वी करण्यासाठी सरनोबत संभाजी भोसले,भूषण बापट,दिलीप मेसरे,संतोष शेटे,अजय भोयर यांच्यासह विविध जिल्ह्याचे प्रमुख, विभागप्रमुख आणि हिंदवी परिवारातील शिवभक्तांनी अथक परिश्रम घेतले मालेगाव येथून अनिल सोळंके,विजय भुरकाडे,रवी वानखेडे, मनोज निकम सर यांनी विशेष सहभाग घेतला.
हिंदवी परिवाराची १५ वर्षांची परंपरा:
हिंदवी परिवाराच्या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मोहिमेत सुसज्ज अशी रेस्क्यू टीम,डॉक्टर पथक,आणि हिंदवी परिवाराची स्वतःची कार्डियाक अंबुलन्स उपलब्ध असते. या मोहिमेत १२ वर्षांपासून ते ४५ वर्षांच्या अबालवृद्धांचा सहभाग असतो, हे विशेष आहे.



