जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

हिंगणा गावातील ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचनाला भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

हिंगणा:- २८ सप्टेंबर २०२६
हिंगणा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाचे वाचन, मनन व पठण सुरू असून, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी या धम्म उपक्रमाला जळगाव जामोद तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष व संस्कार आयुष्यमान मधुकर जी गवई, रा. सातळी, भारतीय बौद्ध महासभेचे संघटक आयुष्यमान तानाजी गवई, रा. सातळी, भारतीय बौद्ध महासभेचे माजी कोषाध्यक्ष आयुष्यमान निलेश जी लहासे, सक्षम न्यूज चॅनलचे संपादक आयुष्यमान सुमित जी दामोदर, तसेच रंजित जी सपकाळ, सिद्धार्थ जी लहासे व गौतम जी इंगळे यांनी आवर्जून भेट देऊन ग्रंथाला अभिवादन केले. आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून हिंगणा गावात येत त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महान ग्रंथाच्या वाचनाचे महत्त्व, भगवान गौतम बुद्धांचा शांती, समता, करुणा, मैत्री आणि मानवतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मविचारांचा समाजजीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत उपस्थितांना अतिशय सुंदर व मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या भेटीमुळे ग्रंथ वाचन करणाऱ्या उपासक-उपासिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी नमो बुद्धाय मित्र मंडळ हिंगणा यांच्या वतीने उपस्थित सर्वांसाठी खीर वाटप करण्यात आले. या संपूर्ण धम्म उपक्रमासाठी वेळ देऊन हिंगणा येथे उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवरांचे नमो बुद्धाय मित्र मंडळ हिंगणा व सुजाता महिला संघ हिंगणा यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आले.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, समाजामध्ये समता, बंधुता, करुणा आणि मानवतेची भावना अधिक दृढ व्हावी, हिंगणा येथे सुरू असलेल्या या धम्म उपक्रमाला मिळालेली मान्यवरांची भेट आणि मार्गदर्शन अतिशय प्रेरणादायी ठरले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button