हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी वाळू लागल्याने सिंचनासाठी तातडीने पाणी द्या!!! अशोक मुरुख

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
रतन भगत.
संग्रामपूर दि२८/९/२६ सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यामध्ये गेल्या ३० ते ४५ दिवसापासून पावसाने उधळी मारल्यामुळे तीव्र अशा प्रकारचा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्य शासनाने पूर्ण आणि कोरडादुष्काळ सुद्धा जाहीर केलेला आहे. परंतु आता तोंडाची आलेली पिके पाण्याअभावी वाढू लागल्याने शेतकरी फार मोठे आर्थिक संकटात सापडलेला आहे. आपल्याजवळ असलेली जमा कोणती त्याने पूर्णतः शेतीमध्ये गुंतविलेली आहे. मात्र यावर्षी मागील ३० ते ४५ दिवसापासून पावसाने दळी मारलेली आहे. त्यामुळे परिसरातील पिके ही वाळू लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर पिकांना वाचवण्यासाठी जिगाव प्रकल्पातून तातडीने सिंचनासाठी पाणी सोडण्याची ही आग्रह मागणी भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष तथा चोंडी चे माजी सरपंच अशोक मुरुख यांनी केली आहे. मुरुख यांनी जिगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता पत्राद्वारे मागणी केली आहे. मनसुधाव येथील १० हजार एकरांपेक्षा जास्त सिंचन क्षमता असलेल्या जिगाव व उपसा सिंचन योजना क्रमांक ७ ची तांत्रिक चाचणी पूर्ण झाली असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या हस्ते तिचे लोक अर्पणही झाले आहे. जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्याने सध्याच्या संकट काळामध्ये ही योजना तातडीने कार्यान्वित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे. यासोबतच लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा यांच्याकडे स्वतंत्र पत्र देऊन चोंडी सिंचन प्रकल्पातून पेसोडा, इथे खेड, कौठळ, टाकळेश्वर आणि चोंडी या गावांना शेतीसाठी, आणि शेतीच्या सिंचनासाठी तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.



