खानदेशजळगावा जिल्हा
मनपा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना त्रास..!

मनपा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जळगांव शहरात ठिकठिकाणी वाईट परिस्थिती उद्वभवली असून शहरातील तांबापुरा आणि फुकटपुरा परिसरात पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्याचे दिसून आले. शहरात नालेसफाईची कामे व्यवस्थितरीत्या पार न पडल्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील अनेक घरांमध्ये घुसून घरातील संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे तसेच पंचशीलनगर फुकटपुरा येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास देखील पाणी साचले होते आरपिआय महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे.व परिसरातील नागरिकांचा मागणी नुसार प.पू डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा कामांसाठी आमदार राजूमामा भोळे यांनी एकलाख रुपये देतो असे जाहीर केले व समाज बांधव यांनी आमदार साहेबाचे आभार मानले तसेच परिसरात आज आमदार राजू मामा भोळे यांनी भेट देवून नागरिकांशी चर्चा केली.



