बुलढाणा

उपयुक्तपदी निवड झाल्याबद्दल मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचावैदू समाजातर्फे सत्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : शंकर शिवरकर

देऊळगाव राजा; नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुणजी मोकळ यांची उपायुक्तपदी निवड झाल्याबद्दल देऊळगाव राजा शहर वैदू समाजाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी वैदू समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती पांडुरंग शिवरकर, मा नगरसेवक तथा शहरप्रमुख अजय अंबादास शिवरकर, किशोर शिवरकर, बाबू हटकर, नितीन हटकर,सुनील शिवरकर, सदाशिव हटकर यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी समाजाच्या वतीने बोलताना उपस्थितांनी सांगितले की, मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी आपल्या कार्यकाळात कोणताही भेदभाव न करता सर्व समाजघटकांसाठी विकासकामे केली. वैदू समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य देत मार्गी लावले. सुमारे ७० वर्षांपासून प्रलंबित असलेला ऐतिहासिक डीपी रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच वैदू समाजाच्या वस्तीत नळ पाणीपुरवठा पाइपलाइन, नाल्यांची उभारणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
यावेळी समाजबांधवांनी अरुण मोकळ यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि भविष्यातही उच्च पदांवर काम करण्याची संधी त्यांना मिळो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमात उपस्थित समाजबांधवांनी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या लोकाभिमुख, विकासाभिमुख व संवेदनशील कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button