स्व.शिवचरण मानेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ पहुरपूर्णा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न……

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव तालुक्यातील पहुरपूर्णा येथे स्व शिवचरण मानेकर यांचा प्रथम पुण्यास्मरणार्थ पहुरपूर्णा येथे भव्य रक्त शिबिर आयोजित केले आहे मोहन डांगे ( रेल्वे पोलीस )यांच्या संकल्पनेतून निस्वार्थ रुग्णसेवा परिवार व साई जीवन रक्तपेढी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शिवचरण मानेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ पहुरपूर्णा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
रक्तदान शिबिराची सुरुवात गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. सरपंच अनंता भाऊ बर्डे, दिलीप भाऊ डांगे, अरुण भाऊ मानेकर तसेच डॉ. दिनेश हिवराळे व अतुल भाऊ भांगे यांच्या हस्ते प्रथम श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानाला सुरुवात झाली.
रक्तदानासाठी गावातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला तब्बल 50 हुन अधिक तरुणांनी शिबिरामध्ये रक्तदान केले.जेमतेम 1500 लोकसंख्या असलेल्या पहुरपूर्णा या छोट्याशा गावामध्ये रक्तदान करण्यासाठी तरुणांमधील उस्फूर्त प्रतिसाद पाहून डॉक्टर आणि पदाधिकाऱ्यांनी तरुणांचे कौतुक करून आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुणांनी अथक परिश्रम घेतले.



