खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

स्थायी समिती व महिला बालकल्याण सभापतींची निर्विघ्न निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता मनपातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील तर महिला व बालकल्याण सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या सिंधुताई कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दोन्ही पदांसाठी केवळ संबंधित उमेदवारांनीच नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने त्यांची निवड पूर्वनिश्चित मानली जात होती. विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने निवड प्रक्रिया निर्विघ्न पार पडली.

आज झालेल्या जळगाव महानगरपालिकेच्या विशेष सभेत पीठासन अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दोन्ही पदांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.

महायुतीकडून मनपात सत्ता स्थापन झाल्यानंतर आता कारभाराला वेग येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button