12 ऑक्टोबरला निंबा येथे प्रशांत (नानाभाऊ ) वराळे यांचा भव्य सत्कार सोहळा व कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन

12 ऑक्टोबरला निंबा येथे प्रशांत (नानाभाऊ ) वराळे यांचा भव्य सत्कार सोहळा व कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन
हिवरखेड वार्ताहर
अंदुरा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक प्रशांत (नानाभाऊ )वराळे यांना लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कुणबी युवा संवाद अकोला -बुलडाणाच्या वतीने 12 ऑक्टोबरला निंबा फाटा येथे हॉटेल सात बारा जवळ त्यांच्या भव्य सत्कार सोहळा व कुणबी समाज स्नेहमीलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.प्रशांत (नानाभाऊ ) वराळे यांनी कृषी, उद्योग, व्यवसाय व शिक्षण या विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लोकमतने त्यांना इंग्लंडची राजधानी लंडन येथे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रसिद्ध सिने अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. प्रशांत वराळे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे कुणबी युवा संवाद अकोला-बुलडाणाने त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे व समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जेष्ठ समाज मार्गदर्शक विश्वनाथजी तिडके, दयारामजी वानखडे अध्यक्ष पांडुरंग कृपा मंगल कार्यालय शेगाव,गुलाबराव महाले अध्यक्ष कुणबी समाज बुलडाणा,ह. भ. प. शिवा बुवा बावस्कार, बाबुरावजी शेळके अध्यक्ष कुणबी समाज विकास मंडळ अकोला, अनिल गावंडे अध्यक्ष अ. भा. कुणबी समाज मंडळ अकोला, प्रमोद बांडाबुचे अध्यक्ष बावणे कुणबी समाज मंडळ अकोला, गजानन थोरात अध्यक्ष जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर मोठी उमरी अकोला, सौ. संध्याताई वाघोडे माजी जि. प. अध्यक्ष अकोला, सौ. वर्षाताई वनारे माजी जि. प. अध्यक्ष बुलडाणा ह. भ. प. शिवदास महाराज गाडेकर पाटसूल असणार आहेत तर अकोला व बुलडाणा दोन्ही जिल्ह्यातील अनेक समाज बांधव प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तरी अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील समस्त कुणबी समाज बांधवानी या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी युवा संवाद अकोला-बुलडाणा यांनी केले आहे.



