बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सेंट पॉल्स अकॅडमीत हिंदी भाषा दिवस उत्साहात साजरा

हिवरखेड : सेंट पॉल्स अकॅडमी, हिवरखेड येथे १४ सप्टेंबर रोजी हिंदी भाषा दिवस विविध साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेच्या उपमुख्याध्यापिका निमिता गांधी मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी शिक्षिका सुलभा एलूकार मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या काव्यवाचनाने झाली. यामध्ये रोही बजाज, जतन आशीष आढीया आणि आस्था सिसोदिया यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात नेहा टोहरे, नंदिनी नाठे, सानिका मानकर, वेदांत सेवक आणि भाविका राठी यांनी आपल्या कविता सादर केल्या.

यावेळी ‘हिंदी—शब्दों से साहित्य तक’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर नाटिका सादर केली. या नाटिकेत अथर्व वानखडे, हर्षित रहाणे, शेख आतिफ, सक्षम टाले, समृद्धी धूळ, श्रेया राऊत, भूमी खानदेशे, पुनीत बजारे आणि खुशी काळे यांनी सहभाग घेतला. तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कविता पठणाचा कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष चंद्रकांत तिवारी सर यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेच्या समृद्ध साहित्यपरंपरेची माहिती देतानाच कविता सादर करून हिंदी भाषा दिवस साजरा करण्यामागील उद्देश आणि हिंदी भाषेच्या संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या हिंदी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुलभा एलूकार मॅडम, आवारे मॅडम, शशिकांत दही सर, चैतन्य खारोडे सर, अंकुश अमानकर सर, शाम जवंजाळ सर आणि मेघा मोरोकार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

हिंदी भाषेचे महत्त्व, तिची साहित्यिक समृद्धी आणि भाषेच्या संवर्धनाचा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध साहित्यिक उपक्रमांमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button