सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.१८/९/२०२६.
सोनाळा: ता. संग्रामपूर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष. बौद्ध धम्म चळवळीचे आधारस्तंभ. चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक, पंडित कश्यप, सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने भारतीय आंबेडकर यांच्या वतीने विनम्र आदरणीय आणि कोटी कोटी अभिवादन करण्यात आले.
यावेळी उरूवेला बुद्ध विहार, सोनाजी नगर तसेच संविधान चौक, भीम नगर सोनाळा येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक धम्मा विषयक आणि संघटनात्मक कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले, अभिवादन सभेला संग्रामपुर तालुका शाखेचे पदाधिकारी, बौद्धाचार्य निलेश लहासे, सिद्धार्थ लहासे, वंचित चे कार्यकर्ते अशोक वानखडे, माजी श्रामनेर तथा समता सैनिक संदीप घाटे, ग्रंथ वाचक तथा माजी श्रामणेर सुमेध दामधर, भाऊराव वानखडे, यांच्यासह सोनाळा गावातील धम्म उपासक-उपासिका महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच दरम्यान भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून बुद्ध धम्म आणि समतेच्या विचारांची वाटचाल पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना उपस्थितांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची भावना व्यक्त केल.



