महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव तसेच सर्व धर्मीय कलावंत मेळावा..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.१४/९/२०२६
बहुजन समाज कलावंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामगाव आणि संत तुकडोजी महाराज सांस्कृतिक कला व बहुउद्देशीय संस्था ता. संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जि.प. शाळेच्या हॉलमध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्ताने राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन निवड समिती सदस्यांचा सत्कार व सर्व धर्मीय कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात निरंतर नि: स्वार्थ भावनेने सामाजिक क्षेत्रात काम करत असलेले युवा नेतृत्व माननीय सुजित बांगर साहेब यांच्या कार्याची दखल घेत संग्रामपूर येथील जी.प. शाळेच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्यातील सर्वधर्मीय कलावंत बहुसंख्येने उपस्थित होते.



