अकोट तालुक्यातील गजानन महाराज पादुका संस्थान म्हणून वळखळ्या जाणाऱ्या मुंडगाव

गणेश मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा व
मंदिराचा जीर्णोद्धार
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे
अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक लालगोटा येथे गणेश मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा जीर्णोद्धार व कळस स्थापना करण्यात आली.सदर मुर्ती बसविण्यात आलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार सुध्दा करण्यात आला या वेळी गणेश मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्यात आली. गावातील नागरीकांची उपस्थिती होती त्या नंतर लगेच महाप्रसादाला सुरवात झाली गावातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.मुंडगाव येथील समस्त गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरा करिता खूप मेहनत घेतली गावातील कार्यक्रम हा पूर्ण रित्या शांततेने पार पडला.



