खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भ

येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम : श्रीमती रक्षा खडसे यांचे उच्च शिक्षणातील नेतृत्वाला नवी दिशा व मार्गदर्शन

जळगाव : उच्च शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, नेतृत्व विकास आणि संशोधनाची परिणामकारक दिशा यावर सखोल चिंतन करण्याची आज नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर (KCE) यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय “Leadership and Research in Higher Education” या विषयावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) ने प्राध्यापक वर्गासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सोहम हॉल येथे झालेल्या पॅनल चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री यांनी संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित राहून प्राध्यापकांशी थेट संवाद साधला. उच्च शिक्षण क्षेत्रातील बदलते परिमाण, संशोधनातील नव्या संधी, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आणि गुणवत्तावृद्धीसाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण या विषयांवर त्यांनी परखड विचार मांडले.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “उच्च शिक्षण संस्थांनी केवळ ज्ञानपुरवठा करणारी केंद्रे न राहता संशोधन, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारी केंद्रे बनले पाहिजेत.” संशोधन संस्कृती बळकट करण्यासाठी प्राध्यापकांनी आंतरशाखीय दृष्टिकोन स्वीकारावा, विद्यार्थ्यांना संशोधनाकडे प्रोत्साहित करावे आणि उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय वाढवावा, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान प्राध्यापकांनी विविध प्रश्न उपस्थित करून धोरणात्मक बदल, संशोधन निधी, गुणवत्ता मूल्यांकन आणि शैक्षणिक स्वायत्तता यांसंदर्भात चर्चा केली. या चर्चेमुळे उपस्थितांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल के.सी.ई. जळगाव परिवाराचे अभिनंदन करण्यात आले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात नेतृत्व विकास आणि संशोधनाभिमुखता वृद्धिंगत होऊन जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button