अखेर तेल्हारा शहरातील रोडवरील खड्डे बुजवण्याला नगरपरिषदेकडून सुरुवात!शिवसेनेच्या मागणीला यश! तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव यांचा सक्रिय पुढाकार!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी
दि १० ऑगष्ट :- तेल्हारा शहरातील मुख्य मार्गावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना व वाहनधारकांना होत असलेला त्रास व खड्ड्यांमुळे होत असलेले अपघात टाळण्यात यावे याकरिता शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव व शहरप्रमुख अनिकेत ढवळे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सातत्याने नगर परिषदेतील अधिकाऱ्यांकडे सदर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याबाबत मागणी केली असता नगरपरिषद प्रशासनाने शिवसेना पक्षाने केलेल्या मागणीची दाखल घेऊन शहरातील खड्डे बुजविण्याला अखेर सुरुवात केली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आगामी पालखी कावड उत्सव , गोगानवमी, गणपती उत्सव ,नवदुर्गा उत्सव ई. पाहता रोड वरील खड्डे बुजवणे अत्त्यावश्यक झाले होते त्याकरिता नगरपालिकेकडे सेनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती . शहरातील मुख्य मार्ग असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक ते शेगाव रस्ता तसेच माळेगाव रस्ता तसेच शहरातील तेल्हारा पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक -संभाजी चौक -प्रताप चौक आदी भागांमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना या मार्गावरून प्रवास करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते तसेच मोठ्या प्रमाणात वाहन धारकांना सुद्धा त्रास होत होता त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे नगर परिषदेकडुन या मागणीची दखल घेत शहरातील मुख्यमार्गासह अनेक ठिकाणी पडलेले खड्डे डांबरीकरणाच्या माध्यमातून बूजविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्रत्यक्ष सेनेचे पदाधिकारी उपस्थितीत राहुन काम करून घेत आहेत. शहरातील ज्या-ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजविण्याकरिता नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत . तसेच खड्डे बरोबर बूजविल्या जात आहेत की नाही याकरिता शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव ,शहरप्रमुख अनिकेत ढवळे व समस्त पदाधिकारी प्रत्यक्ष उभे राहून काम बरोबर होत आहे की नाही ते पाहणी करून काम करून घेत आहेत.



