नवीन चालू असलेल्या रस्त्यामध्ये दुभाजक करण्यात यावे..

*नवीन चालू असलेल्या रस्त्यामध्ये दुभाजक करण्यात यावे..* -शिवसेना तेल्हारा शहर व तेल्हारा तालुका यांची सा.बां.विभाग तेल्हारा यांना निवेदनाद्वारे मागणी.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी व्ही एम घोडे.तेल्हारा दि २१. अडसूळ ते तेल्हारा ,तेल्हारा ते हिवरखेड व तेल्हारा ते माळेगाव बाजार पर्यंत नवीन सुरू असलेले रस्त्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले असल्याचे दिसून येत आहे या रस्त्यावर लहान मुलांचे शाळा व महाविद्यालय आहे यामधील बहुतांश भाग हा रहदारीचा रस्ता असून येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येथे दुभाजकाची आवश्यकता आहे .तेल्हारा शहरातील नर्मदाबाई बोडके महाविद्यालय ते केशव मंगलम हेडगेवार मंगल कार्यालय या भागात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दुभाजकं असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच तेल्हारा ग्रामीण भागातील माळेगाव बाजार व बेलखेड व हिवरखेड गावालगत दुभाजक करण्यात यावे जेणेकरून संभाव्य अपघातास आळा बसेल. अशा स्वरूपाची मागणी समस्त शिवसेना तेल्हारा शहर व तेल्हारा तालुका यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा यांना दि २१/८/२०२३ सोमवार रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली ,निवेदनाची दखल गांभीर्याने न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद आहे. यावेळी निवेदनावर तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव ,तेल्हारा शहर प्रमुख अनिकेत ढवळे ,उप तालुकाप्रमुख प्रकाश पाटील ,दिलीप वामनराव पारसकर ,गोपाल महादेवराव आमले ,विकी सुनील वाघ ,प्रकाश भाऊ वानखडे ,शैलेश प्रकाश वानखडे ,शुभम गजानन खंडारे ,आदित्य किशोर इंगळे ,अंकुश गणेश खंडारे ,शुभम कैलास इंगळे ,प्रशांत मोहन गावत्रे ,आशिष दिलीप जसंपुरे ,निखिल दिलीप हिवराळे ,राजेश मोहन गावात्रे ,मयूर किशोर वर्मा ,शिवराम राजेश गिरी ,निलेश शशिकांत वाडेकर ,प्रमोद मनोहर भोंगळे ,प्रकाश बाबुराव चिकटे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत



