जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

सारंगवाडी जलप्रकल्प :वॉटर फ्रंट कंपनीचा लबाडीचा डाव उघड

स्टार भारत लाईव्ह ऐकसप्रेस

चिखली: प्रतिनिधी

आरुना दतात्रय खंडागळे

आमदार श्वेता महाले पाटील यांची ‘झिरो टॉलरन्स’भूमिका…

सारंगवाडी येथील जलप्रकल्पात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची लक्षवेधी सूचना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ठामपणे मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देताना संबंधित खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून तीन महिन्यांत चौकशी अहवाल सादर केला जाईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सभागृहात दिली होती.

मात्र या प्रकल्पाचे काम ज्या वॉटर फ्रंट प्रा. लि. या कंपनीकडे आहे, ती कंपनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली लंगोटी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र समोर येत आहे. मुळात भ्रष्टाचार हाच ‘कार्यसिद्धांत’ असलेल्या या कंपनीने राज्यभरात अशाच प्रकारे अधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरप्रकार केल्याचे आरोप आमदार श्वेता महाले पाटील यांनी लक्षवेधीतून संपूर्ण राज्यासमोर मांडले होते.

राज्यस्तरावर विधानसभेत प्रकरण उघड झाल्यानंतर, सारंगवाडी प्रकल्पात पूर्वी प्रत्यक्षात न केलेल्या कामांची देयके आधीच काढून आता त्या कामांना घाईघाईने हात घालून SIT चौकशी ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. चौकशीचा कालावधी संपण्यापूर्वी कागदोपत्री त्रुटी झाकण्यासाठी कामे पूर्ण केल्याचे भासवणे, हा स्पष्टपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे.

या संपूर्ण प्रकरणावर आमदार श्वेता महाले पाटील यांची अत्यंत बारीक नजर असून, कंपनीचा हेतू उघड करण्यासाठी त्यांनी आज स्वतःची टीम प्रकल्पस्थळी पाठवून वास्तव परिस्थितीचा आढावा घेतला.कोणती कामे आधीच देयकांमधून दाखवली गेली होती? आणि कोणती कामे आता केवळ चौकशीच्या भीतीने पूर्ण केली जात आहेत?, याचा तपशीलवार हिशेब ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आमदार महाले यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, पूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी पूर्ण झाल्याशिवाय उर्वरित कामे करण्याची परवानगी देऊ नये.तसेच, लक्षवेधी मांडल्यानंतर सुरू झालेल्या प्रत्येक कामावर विशेष लक्ष ठेवून चौकशी टाळण्यासाठी कोणती कामे केली जात आहेत, याची स्वतंत्र नोंद घ्यावी.

​”भ्रष्टाचार हाच ज्या कंपनीचा सिद्धांत आहे, त्यांना मोकळे सोडणार नाही. ज्या कामांचे पैसे आधीच लाटले, ती कामे आता चौकशी टाळण्यासाठी पूर्ण करण्याचा प्रयत्न हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. जोपर्यंत मूळ भ्रष्टाचाराची सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या कंपनीला कोणतेही काम करू देऊ नये.”
— आमदार श्वेता महाले पाटील

भ्रष्टाचाराबाबत ‘झिरो सहनशीलता’ ही आमदार श्वेता महाले पाटील यांची ठाम भूमिका असून,कोणताही दबाव, संगनमत किंवा कागदी दिखावा चालू दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. सारंगवाडी जलप्रकल्पातील प्रत्येक रुपयाचा हिशेब आणि प्रत्येक कामाची सत्यता जनतेसमोर आणलीच जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button