महाराष्ट्रविदर्भ

श्री राम प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी दारू दुकाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा… भाजप युवा मोर्चा जिला उपाध्यक्ष मंगेश ताडे

अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे

अकोट :अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या दिवशी दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दारू दुकाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेऊन परिसरात कोणत्याही प्राण्याची हत्या होऊ नये.तसेच कुठलाच अनुचित प्रकार घडू नये या करिता देशी विदेशी दारू विक्री बंद करावी.हा दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा व्हावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पू.ताडे यांचे वतीने दहीहंडा पोलीस स्टेशन ठाणेदार योगेश वाघमारे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात मंगेश ताडे यांनी पत्रात म्हटले आहे की, अयोध्या मंदिरात रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेने संपूर्ण भारत देशवासीयांचे स्वप्न साकार होत आहे.त्या अनुषंगाने २२ जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे मंगल व पवित्र वातावरणात आनंदोत्सव देशभर साजरा होत आहे. या दिनी परिसरातील दारू व मांस विक्री करणारे धाबे,दुकान,हॉटेल इत्यादी ना सुधा बंद ठेवण्याचे आवाहन केले. या वेळी भाजप युवा मोर्चा पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थिती होते.शुभम लोणे , विशाल वडाळ , गणेश राणे , स्वप्नील मुंडे , सूर्जन पेटे, पप्पू वाकोडे , आकाश तराळे, पवन भांडे , जिवन खवले,संभा निमगरे , किसन गेंद , रोशन ठोसरे , गजानन येलोने , गोपाल सुलताने, पवन आढे , राहुल वडाळ , शिवा फुकट , कुणाल वडाळ , आदेश गेंद , सुयोग वडाळ , देवेंद्र हंबर्डे , पंकज जुमले , चंद्रशेखर नारोकर , विक्रम ढवळी, प्रवीण कोंडाळे, रोहन वानखडे , अनिल अहिर ,मनिष वडाळ , प्रशांत मुंडाले , शितिज बुंदे , प्रशांत इंगळे , प्रतीक पेटे, अक्षय उमाळे , अक्षय वारे , वैभव बिहाडे. उपस्थित होते ….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button